दृष्टी
ज्ञानाची उपासना हाच आनंदाचा मार्ग
समविचारी आणि समान ध्येयाने एकत्र आलेल्या लोकांना व्यासपीठ उपलब्ध करणे हे आमचे उद्दीष्ट आहे. आम्ही या व्यासपीठावर कला, साहित्य, वैद्यकीय, इतिहास, कविता, चरित्रे इत्यादी क्षेत्रांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. जेणेकरून ज्ञानाच्या महासागरातील विविध क्षेत्राबद्दल वाचकांच्या मनात अधिक अधिक रुची निर्माण ह्यावी.
ध्येय
वाचन संस्कृती जोपासणे आणि वाचकांची दृष्टी वाढविणे आणि अर्थातच ‘The Leading Phase’ चे सर्व कार्यकर्ते नेहमीच सर्व वाचकांपर्यंत उत्कृष्ट आणि दर्जेदार असे साहित्य पोहोचविण्याचा प्रयत्न करत असतात.
आमचा संघ

अपूर्व कुलकर्णी
Editor In Chief & Blogger
नमस्कार, मी अपूर्व कुलकर्णी, मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे. परंतु इंजिनीरिंग बरोबरच मला नेहमीच साहित्य, इतिहास, अर्थशास्त्, तत्त्वज्ञान, नाटक आणि संगीत हे विषय कायमच जवळचे वाटत आले आहेत आणि अर्थात या विषयांबद्दल अधिक जाणून घेण्याचा वाचन हा एकमेव मार्ग. जसे की, रामदास स्वामी म्हणतातच, ‘दिसामाजी काही तरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे’. त्यामुळे ही ओवी मला सततच प्रेरणा देत आली आहे. म्हणूनच आपण पुस्तकांकडून खूप काही आणि हवे तितके शिकू शकतो. म्हणून वाचन हा माझ्यासाठी नेहमी आनंदाचा मार्ग ठरला आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेतमधील अनेक थोर लेखक कायमच माझ्यासाठी एक प्रेरणा स्रोत राहिले आहेत. त्याचबरोबर माझे काही लेख वृत्तपत्रात देखील प्रसिद्ध झालेले आहेत. शेवटी, काय तर तुम्ही देखील आमच्यात सामील व्हा आणि ह्या ज्ञानगंगेचा आपण सर्वजणच आनंद घेऊयात.

श्रेय कोठावदे
Blogger, Content & Social Media Manager
नमस्कार वाचकांनो, माझी ओळख म्हणजे व्यवसायाने इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिक पण नेमबाजी, कराटे व synthesizer वाजवणे यांच्यात छोट्या प्रमाणात सफलता मिळवण्यात यश आले आहे. बुद्धीस चालना देण्याऱ्या उपक्रमांमध्ये मला नेहमीच अभिरुची सापडते. माझी नवीन शिकण्याची वृत्तीमुळे मी वाचनाच्या अधीन झालो व विविध विषयांतील कुतूहल आणि जिज्ञासू वृत्तीने मी लेखनाकडे वळलो. आध्यात्मिक, चारित्र्य, उद्योजकता, व्यवसाय व्यवस्थापन,इ.अश्या वैविध्यपूर्ण विषयांवर वाचन करण्याकडे माझा नेहमी कल असतो. माझ्या मते content तेच असत जे वाचकाच्या आयुष्यात काही भर करू शकत. J K Rowling यांचे एक सुंदर वाक्य मला नेहमी भावते, “मला विश्वास आहे, जेव्हा आपण एखादे चांगले पुस्तक वाचतो तेव्हा आपल्या आयुष्यात काही चमत्कार नक्कीच होऊ शकतो.”

ताहिरा अहमद
Community Manager & Blogger
माझं नाव ताहिरा अहमद आहे आणि मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे. मला नेहमीच लिखाणाविषयी आवड वाटत आली आहे. शाळेच्या स्पर्धेमध्ये किंवा फक्त स्वतःसाठी मी लिखाण करत असे. मानवी स्वभाव आणि त्यांच्या वागण्याच्या पद्धती याविषयी वाचण्याची मला अत्यंत उत्कंठा वाटायची आणि त्यामुळे त्याविषयी लिहिण्याची सुद्धा एक खळबळ मनात जागी झाली. माझ्या आजोबांनी सांगितलेली एक गोष्ट माझ्या अजूनही लक्षात राहिली आहे ती म्हणजे - "दील मिले ना मिले, हाथ मिलाए चलीये". याचा अर्थ समजावून सांगताना ते म्हणाले की आपण इतरांचा नेहमी आदर केला पाहिजे जरी त्या लोकांशी आपली मतं जुळली नाहीत तरी चालेल.”

डॉ. धनंजय पटेल
Blogger
नमस्कार! मी डॉ. धनंजय पटेल. एका इंजिनीरिंग महाविद्यालयात एक प्राध्यापक म्हणून काम करतो. Anna Quindlen यांनी म्हटल्याप्रमाणे. ‘पुस्तके हे विमान, आणि ट्रेन आणि रस्ता आहेत. तसेच प्रवासाचे अंतिम ठिकाण, प्रवास, व तेच घर आहेत. ’अशा प्रकारे वाचन आणि लिखाण नेहमीच मला चैतन्य देतात. जेव्हा जेव्हा मी माझ्या आवडीची सामग्री वाचत असतो तेव्हा मी स्वतःशी पूर्णपणे सुसंगत असतो. आणि मला वाटते की केवळ ज्ञान बाह्य मदतीने शोधले जाऊ शकते. म्हणून आपण नेहमी ज्ञान शोधण्याच्या स्थितीत असले पाहिजे ज्यासाठी वाचन आणि लेखन हाच अचूक मार्ग आहे.

डॉ. अंजली देशपांडे
Blogger & Poet
नमस्कार, मी एक संशोधक आणि IEEE ची वरिष्ठ सदस्या, LMISTE, IETE ची सदस्या, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स ची सदस्या अशी माझी ओळख. माजी प्राध्यापक आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभागाची प्रमुख म्हणून मी प्रभार सांभाळला आहे. मला विद्यार्थ्यांसोबत रहायला आवडते, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करताना, त्यांच्याकडून नवीन गोष्टी शिकण्यास मिळतात. हे माझ्यासाठी नेहमीच एनर्जी ड्रिंक असते.
मी माझ्या लहान वयातच एक वाचक आहे आणि आजही मनामध्ये सकारात्मकता पसरवण्यासाठी काहीतरी वाचत आहे. मला वाटते की आपल्या कल्पना व्यक्त करण्यासाठी आणि लोकांशी संपर्क साधण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे लेखन. बर्याच महान लेखकांद्वारे प्रेरित होऊन, ज्यांनी मला चांगल्या व्यक्तिमत्त्वासाठी बदलले आहे. मी नुकतेच लिहायला सुरुवात केली. मला प्रेरणादायक बाबी, निसर्ग कविता आणि प्रवासाच्या अनुभवांबद्दल लिहायला आवडते.

डॉ. चित्रा गोस्वामी
Blogger & Poet
नमस्कार, मी चित्रा गोस्वामी रत्नागिरी येथील एका कॉलेजमध्ये हिंदीची प्राध्यापिका आहे. लहानपणापासून शांत स्वभावामुळे काही बोलण्यापेक्षा वाचन मला जास्त आवडत असे. साधारण आठवीपासून मी कविता, गोष्टी आणि नाटके लिहायला सुरुवात केली आणि जे ही लिहीत होते ते वर्षानुवर्षे जपून ठेवत होते. हळू-हळू वयानुसार लिखाणाला एक दूरदृष्टी आणि धार चढत गेली. आजपर्यंत हिंदी आणि मराठी भाषेमध्ये कविता आणि गोष्टींची पुस्तके देखील प्रकाशित झाली आहेत. मूलतः आई आणि वडील यांच्या प्रेरणेमुळेच हे लेखन, वाचन होत आले आहे. ईश्वर कृपेने या मध्ये अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. म्हणतात ना , 'कोशीश करनेवालों की कभी हार नहीं होती.'

शर्वरी ताथवडेकर
Blogger
'Tell me and I shall forget, show me and I may remember, involve me and I will understand.' असे म्हटले जाते ते खरेच आहे. विद्यार्थ्यांना कृतिशील बनवणे व अध्ययनात त्यांचा कृतीयुक्त सहभाग घेणे महत्वाचे ठरते.
नमस्कार! मी शर्वरी, मी शिक्षक प्रशिक्षक असून भाषा शिक्षण हा माझा आत्यंतिक आवडीचा प्रांत. प्रयोगशील पद्धतीचा वापर करून व विद्यार्थ्यांना अध्ययन प्रक्रियेत सहभागी करून, विद्यार्थी केंद्रित वातावरणात माझ्या वर्गातील मुले आनंदाने भाषा अध्ययन करतात. असिस्टंट प्रोफेसर म्हणून एम एड कॉलेजमध्ये मी काही वर्षे अध्यापन केले आहे. 'संवाद' या बालक व पालक यांच्याकरिता काम करण्याऱ्या गटाची मी सदस्य आहे. मला वाचनाची अत्यन्त आवड तर आहेच त्याचबरोबर ललित लेखन हा ही माझा आवडीचा प्रांत. या blogs च्या माध्यमातून मी माझे विचार मांडणार आहे. धन्यवाद!

पुष्कर नाचणे
Blogger
मी,पुष्कर नाचणे,अंतिम वर्ष आयुर्वेदाचार्य (BAMS) विद्यार्थी आहे.मला वाचनाची आवड शाळेत असल्यापासून जडली.बरीच मराठी,इंग्रजी भाषेतील पुस्तके वाचण्यात आली ज्यात ऐतिहासिक,अनुवादित,चरित्र,कादंबरी आणि अशा अनेक पुस्तकाचा समावेश आहे.वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश केल्या नंतर आयुर्वेदिक ग्रंथ,संहिता यांची ओळख झाली,तेव्हा हे समजले की आपल्या पूर्वज वैद्यांनी (चरक सुश्रुत या वैद्यांनी) सर्व छोट्या मोठ्या व्याधींचा समग्र अभ्यास आणि विवेचन दिलेले आहे.याच क्लिष्ट संकल्पना सोप्या भाषेत बनवून वाचकांसमोर मांडणे या उद्देशाने मी लिहायला सुरुवात केली.वाचकांचे वैद्यक शस्त्रातली रुची वाढावी व त्यांचे भय कमी व्हावे यासाठी लेखन करणे हे माझे उद्दिष्ट आहे.

Blogger
नमस्कार मी निकिता, IIT Bombay मध्ये Post Doctoral Fellow म्हणून कार्यरत आहे. माझी प्रत्येक निर्मिती माझ्या अंतःकरणाच्या दिशेने एक पाऊल आहे, जी मला माझ्या मनाने आत्मसात करते. या भावना लादणे, माझ्यासाठी हे विश्वाचा स्वीकार करण्यासारखे आहे. कागद म्हणजे आकाश आणि पेन म्हणजे रवी, कवी ही समाजातील साक्षरतेची प्रतिमा आहे.

पूर्वा हिंगणे
Blogger
माझे नाव पूर्वा हिंगणे आहे आणि मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे.मी शाळेत असल्यापासूनच पुस्तकं वाचते आणि जेव्हा जेव्हा मी एखादं पूस्तक वाचायला घेते, तेव्हा मला कसलंच भान राहत नाही. मी पुस्तकांच्या जगात एकदम हरवूनच जाते जाते. त्यावेळी मी खूप पुस्तकं वाचायचे त्यामुळे मला असं वाटायचं की मी लिहू हि शकते. पुस्तक वाचणे आणि स्वतःसाठी ऐश्वर्यासाठी लिहिता लिहिता मला खऱ्या जगात न काही वेळासाठी विश्रांती मिळते. म्हणजे काही वेळासाठी पुस्तकांच्या जगात विसावा मिळतो. असं वाटतं की मी कोणाबरोबर तरी आत्ताच छान गप्पा मारल्या आहेत. त्यांच्या गोष्टी जाणून घेतली आहेत. मी जी पुस्तकं वाचायची त्यांच्याबद्दल काही तरी लिहून ठेवायला मला आवडतं. कोणी तरी म्हटलं की- "Once you have accepted your flaws,no one could use them against you." या वाक्याने मी खूप प्रभावित झाले होते. कारण माझ्या लक्षात आलं की सगळ्यात पहिली आणि सगळ्यात कठीण पायरी आपण ओलांडलेली असेल. ती म्हणजे आपल्या मधल्या त्रुटी ओळखणं, आणि एकदा का आपण आपल्या मधले त्रुटी ओळखल्या आणि त्या मान्य केल्या की मग एक शेवटची पायरी येते ती म्हणजे त्यांच्यावर मात करणे किंवा त्यांना काही प्रमाणात कमी करणे.

अजय चौरसिया
Blogger
नमस्कार मित्रांनो, मी अजय चौरसिया, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम अभियांत्रिकी आणि सामाजिक कार्यकर्ता आहे. लेख, कविता, कथा, नाटकं देखील माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत.ज्यामध्ये मला कविता लिहायला आवडतात. आपले शब्द आणि भावना लोकांसमोर ठेवण्यासाठी कविता हे एक माध्यम आहे.
दिमाग नही दिल अपने पास रखता हूँ,
शायर हूँ जनाब, शायरी पास रखता हूँ,
कोरे कागज़ों की किस्मत बदल दू मैं,
ऐसी एक कलम साथ रखता हूँ..