top of page
Search

शस्त्रक्रिया:भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान- भाग 2

या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी खालील links वर click करा.

भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान भाग 1

भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान भाग 2

भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान भाग 3

भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान भाग 4

 

आयुर्वेद हा वैद्यकशास्त्राचा मूळ गाभा आहे.त्याच्या विविध अंगांपैकी शल्यंतंत्र हे एक प्रधान अंग आहे असे वर्णन विविध वैद्यकीय ग्रंथात आणि संहितामधे आले आहे.

'आशुक्रिया करणाद्यांत्र शस्त्र क्षाराग्नी प्रणीधानात सर्वतंत्र सामन्यात च |'

- सु. सू. १/१७

ज्यामधे यंत्र, शस्त्र,क्षार,अग्निकर्म यांचा समावेश चिकित्सेत होतो व शिघ्रतेने रोगनिवारण क्रिया पूर्ण होते ते शल्यतंत्र होय असे आचार्य सुश्रुत यांनी सांगितल आहे.


सुश्रुत संहिता हा केवळ एक च ग्रंथ नसून औषधेनव, औरभ्र, पौष्कलावत हे ही इतर मुख्य शल्यविषयक ग्रंथ उपलब्ध होते.परंतु दुर्दैवाने आज यातले इतर ग्रंथ उपलब्ध नाहीत.

कोण होते आचार्य सुश्रुत ??


Ref (सू.उ.६६/३) (सू. चि. २/३) (सू.उ.१८/३)

काशीराज दिवोदास धन्वंतरी (ई.पू.५०००) यांचे शिष्य व महर्षी विश्वामित्र यांचे पुत्र असे वर्णन महाभारतात आले आहे.भगवान धन्वंतरी यांच्यापासून सुश्रुत यांनी शल्यतंत्र विद्या प्राप्त केली व ग्रंथ निर्माण केला त्यालाच सुश्रुत संहिता अस म्हणतात.हा शल्य संप्रदायाचा प्रमुख ग्रंथ आहे.


पूर्वीचा काळी सर्जरी म्हणजे शस्त्रकर्म केले जात होत्या का?

शस्त्राद्वारे जी कर्मे केली जात(शस्त्रक्रिया) त्यांचे आठ प्रमुख प्रकार सुश्रुतांनी सांगितले आहेत. ज्यांना अष्टविध शस्त्रकर्म किंवा अष्टविध कर्म असे म्हणतात ती कर्मे पुढीलप्रमाणे

Ref- (सु.सू.५/१५)

  1. छेदन (कापणे किंवा excision)

  2. भेदन (फोडणे किंवा incision)

  3. लेखन (खरवडणे किंवा scraping)

  4. वेधन (भोक पाडणे किंवा puncture)

  5. एषण (सळई टाकून खोली पाहणे किंवा probing)

  6. आहरण (बाहेर काढून टाकणे किंवा extraxtion)

  7. विस्त्रावण (वाहवणे किंवा drainage)

  8. सीवन (शिवणे किंवा suturing)

  9. या कर्मांचे वर्णन आहे प्रत्येक कर्म करण्यासाठी कुठला व्याधी योग्य आहे आणि कुठला योग्य आहे याचेही सविस्तर वर्णन सुश्रुत आचार्यांनी केले आहे.


या कर्मातील सीवन कर्म म्हणजेच जखम शिवणे किंवा टाके घालणे याचं सविस्तर वर्णन आपण उदाहरणादाखल बघू.


शस्त्रक्रियेतील जखमा विशेषतः पोटावरील जखमा शिवण्यासाठी पूर्वीच्या काळी वैद्य लोक मोठमोठे मुंगळे वापरत असत. जखमेच्या तोंडावर वैद्य तो मुंगळा भरत, त्याने जखम चावली व ती बंद झाली की, मुंगळा च्या तोंडाचा भाग तसाच ठेवून मागचा भाग तोडून टाकण्यात येत असे. ठराविक अंतरावर असे मुंगळे ठेवून पूर्ण जखम शिवली जात असे. अंतर्गत जखमा शिवताना याने पोटाची पिशवी ठेवली जायची. नंतर जसजशी जखम भरेल तसे तसे हे टाके आतल्या आत जिरून जात. आता हे तंत्र भारतामध्ये वापरत नसले तरीही आफ्रिका आणि अमेरिकेच्या काही आदिम जमाती याचा वापर आजही करताना दिसतात.


आधुनिक तंत्रज्ञानाची सोय नसतानाही शरीरातील सूक्ष्म अती सूक्ष्म अवयव यांचा अचूक अभ्यास कशा प्रकारे वैद्य करत असतील??


याच उत्तर आहे शवविच्छेदन…हो!! सुश्रुत आचार्यांनी शवविच्छेदन म्हणजेच आज च्या भाषेत पोस्टमार्टम (PostMortom of cadavers) याचे वर्णन केले आहे


शवविच्छेदन विधी – ref (सू.शा.५/४९)

शरीराच्या अंग प्रती अंगाचा अभ्यास करण्यासाठी शवविच्छेदन करावे. त्यासाठी मृत शरीर निवडताना ते शरीर सर्व अंग अवयव यांनी प्राकृत म्हणजे normal असावे. स्वस्थ व्यक्तीचे,कोणत्याही दुर्धर आजार न झालेल्या व्यक्तीचे, हे मृत शरीर असावे. या मृत शरीरास मुंज, कुश, शण या वनस्पतींच्या वेली गुंडाळून ते शरीर एका पिंजऱ्यामध्ये ठेवावे. हा पिंजरा संत वाहणाऱ्या नदीमध्ये प्रकाश रहित स्थानी बांधून पेटी प्रवाहात पुढील असा बांधून ठेवावा. सहा दिवसांनंतर कोथ म्हणजेच सडण्याची प्रक्रिया झाल्यावर सातव्या दिवशी शरीर पिंजऱ्यातून बाहेर काढावे.वेणू(बांबू सदृश), वल्व या झाडांच्या कुर्च्या (खराटे) बनवून हळूहळू त्वचा काढावी आणि नंतर विविध शस्त्रांचा वापर करून अवयवांचे आणि सर्व प्रती अंगाचे परीक्षण करावे व नोंदवावे. अशा शवविच्छेदन प्रक्रियेने शरीर रचनेची इतंभूत माहिती तत्कालीन शल्य चिकित्सकांना माहिती होती म्हणूनच त्यांची शस्त्रक्रिया एक्स-रे सारख्या तंत्रज्ञाना शिवाय सुद्धा अचूक पद्धतीने होत होती.


थेट माणसांवर विविध शस्त्रक्रिया करण्याआधी नव्या चिकित्सकांना प्रशिक्षण कस दिलं जातं असेल?

आयुर्वेद एक प्रत्यक्ष कर्मा अभ्यासाची विद्या आहे. यामध्ये केवळ शास्त्र ज्ञान असणे पर्याप्त नाही त्यासोबतच क्रिया अभ्यासणे म्हणजेच कर्म निष्णात होणे हे ही गरजेचे आहे, म्हणूनच वरती सांगितले अष्ट विध शस्त्रकर्म मानवी शरीरावर करण्यापूर्वी वैद्यांना निर्जीव वस्तू आणि माणसाच्या तुकडे इत्यादींवर करावा लागायचा यालाच योग्या विधि असे म्हणतात.

योग्या म्हणजेच मानवी शरीरावर शस्त्रकर्म करण्यापूर्वी अन्य वस्तूंवर त्याचा केलेला अभ्यास होय.छेदन,भेदन आदी विविध कर्म करण्यासाठी चामड्याच्या पिशवीमध्ये बुळबुळीत शेवाळ भरून गळू कापण्याचे प्रशिक्षण देणे,टाके घालण्यासाठी विविध जाडीची कापड आणि प्राण्यांच्या चमड्यायावर सराव करावा लागत असे. रक्ताची भीती आणि रोगाचे घृणा वाटू नये यासाठी अनेक प्रकारे सराव करून घेण्यात येत असे. या योग्य विधि ने निवड झालेल्या चिकित्सक केले कर्म करताना संदेह ग्रस्त होत नाही.. अशाप्रकारे नवीन शल्य चिकित्सकांना निपुण व प्राणाभिसार( प्राण वाचवणारा) चिकित्सक घडवले जात.


ज्याप्रमाणे काही आधुनिक सर्जरी ने quick and irreversible असा फरक पडतो, तस कोणत शस्त्र कर्म आहे का? जे तत्काळ वेदनाशामक व अपूनरुद्भव चिकित्सा म्हणून काम करेल?तर याच उत्तर आहे अग्नी कर्म आणि रक्तमोक्षण ही दोन कर्मे..काय आहेत ही कर्म ?याचे वर्णन आपण पुढच्या लेखात सविस्तर बघणार आहोत.

त्याच बरोबर प्लास्टिक सर्जरी ही सर्वात आधी आपल्या देशात केली जायची त्यामधे कान आणि नाक यांचे कापलेले भाग जोडण्याची शस्त्रक्रिया,कोणत्याही शस्त्रक्रिया नंतर चां निर्जंतुकीकरणचा भाग, शालाक्य म्हणजे खांद्याच्या वरच्या शस्त्रक्रिया यांचे ही वर्णन सुश्रुत संहितेत आहे तर याच प्रवासाचा पुढील टप्पा आपण पुढच्या लेखात पाहू

- पुष्कर नाचणे

bottom of page