भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान-भाग ४
या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी खालील links वर click करा.
भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान भाग 1
भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान भाग 2
भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान भाग 3
भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान भाग 4

शालाक्यातंत्र म्हणजे नक्की काय? त्यामधे काय वर्णन आले आहे?
आयुर्वेदाच्या ज्या शाखेमध्ये जत्रूच्या वर असणाऱ्या कर्ण,नेत्र,नासा,मुख,शिर या अवयवांचे रोग,त्यांचे निदान,चिकित्सा(शस्त्रांनी केली जाणारी विविध रोग निवारक कर्मे जसे अंजन कर्म) यांचे वर्णन केले आहे व ज्यात शलाका यंत्राचे (शलाका यंत्रामध्ये एकूण 28 विविध यंत्रांचा समावेश आहे ज्यात आज उपलब्ध असणाऱ्या Dilators,Dissectors,Probes,spud यांचा समावेश आहे)
याच शालाक्य चे वर्णन आपल्या सोयी करिता दोन विभागात करता येऊ शकते.पहिल्या भागात नेत्ररोग व त्यांचे चिकित्सा,शस्त्रकर्म यांचे वर्णन आहे. दुसऱ्या भागात शिरो कर्ण नासा व शिरोरोग यांचे वर्णन आहे (म्हणजे कान नाक घसा व डोक्याचे रोग यांचे वर्णन).
सुश्रुत आचार्यांनी किती नेत्र रोगांचे वर्णन केले आहे?आज बघतो ऐकतो त्या मोतीबिंदू ची शस्त्रक्रिया, दृष्टी नाशाची शस्त्रक्रिया सुश्रुत संहिता मधे आहे का?
एकूण ७६ नेत्र रोगांचे वर्णन सुश्रुत संहितेत आले आहे.त्यात अनेकाविध रोग आले आहेत त्यात मोतीबिंदू चे सुद्धा वर्णन आले आहे. आपल्याला समजण्याच्या दृष्टीने आपण मोतीबिंदू म्हणजे cataract या शस्त्रक्रिया विषयी पाहू. यालाच लिंगनाश असे वर्णन आले आहे(ज्यात दृष्टी पटलाची विकृती होऊन डोळ्यासमोर एक निळसर किंवा तांबूस घामाच्या,पाण्याच्या थेंबा सारखा वेदना युक्त लिंगनाश होतो व समोरच्या वस्तू दिसत नाहीत,दृष्टी नाश होतो यालाच मोतीबिंदू म्हणतात)
शस्त्रक्रिया -- या शस्त्र क्रियेमध्ये रुग्णाचे उचित पद्धतीने पथ्य पालन व शस्त्रकर्म पूर्व
नियम पालन झाल्यावर,त्यास मऊ आसनावर बसवून ज्या डोळ्यात दृष्टी नाश आहे त्या डोळ्याचं मर्दन करून तो स्थिर झाल्यावर शलाका यंत्राने विशिष्ट पदधतीने वेधन करून, तो मोतीबिंदू फोडावा म्हणजे लेखन करावे ज्यातून विशिष्ट प्रकारचा आवाज येतो, व नंतर पाण्याच्या एका थेंब सारखं स्त्राव होतो.या नंतर डोळ्याचे घृत लावून त्याचा पिचू ठेवून बांधावा( औषधी तुपाचा एक बोळा).नंतर धूळ, धूर, उन, वारा नसणाऱ्या घरात मऊ आसनावर त्यास आराम करायला सांगावे व इतर पथ्य सांगावीत असे सांगितले आहे.

याच प्रमाणे नाकाच्या व्याधिंमचे नासा अर्श (Nasal Polyp),नासा अर्बुद(tumor of the Nose) यांच्या शस्त्रक्रियेचे वर्णन आले आहे.कानाच्या पडद्याचे व्याधी त्यांची शस्त्र क्रिया डोक्याच्या विविध शस्त्रक्रिया या व यासारख्या अनेक छोट्या मोठ्या शस्त्र कर्माचे व शस्त्रक्रियेचे वर्णन आचार्य सुश्रुत यांनी केलं आहे.
या लेख मालिकेतून मी आपल्या सर्वांना सुश्रुत संहिता व त्यातले विविध विषय यांचे पैलू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.आपण या लेख मालिकेत पाहिलेल्या सर्व शस्त्रक्रिया या केवळ आपल्या वाचकांची सुश्रुत संहिता,आयुर्वेदातील शस्त्रक्रिया या विषयाची ओळख व्हावी व आपल्या पूर्वजांकडून आपल्याला लाभलेला आयुर्वेद नावाचा जो अमूल्य वारसा आहे त्याला जपण्यासाठी, अंगिकारण्यासाठी हातभार लावावा. सुश्रुत संहिता खूप विस्तृत व प्रगल्भ आहे,याचा मी केवळ छोटासा अंश आपल्या समोर मांडला. शस्त्रक्रिया म्हटल की आपल्यातल्या बऱ्याच लोकांना रक्त आणि त्यामुळे अंगावर येणारा काटा किंवा भोवळ येते,पण वास्तवात शस्त्रक्रिया सोप्या भाषेत सर्वाँना कळावी त्याची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने ही लेख मालिका आरंभली होती. तेंव्हा आपणा सर्वांना कशी वाटली ही लेख मालिका हे खालील comment box मध्ये नक्की कळवा.
त्याचबरोबर असेच अनेक विविध प्रकारचे आणि विविध विषयांवरील लेख वाचण्यासाठी The Leading Phase ला subscribe करा.