कोरोना पथ्य व अपथ्य
कोरोना संबंधित काही पथ्य आणि अपथ्य
1. बरे होणाऱ्या लोकांची संख्या वाढते (83%), आणि मृत्यु दरात घट होते आहे.म्हणून घाबरण्याचे बिलकुल कारण नाही.
2. याआधी जस मी म्हटलं होतं, की ही महामारी नसून महा संक्रमण आणि महा साथ आहे.
3. सध्याच्या काळामध्ये हळद आणि दुध नको त्याऐवजी हळद आणि मध चालू शकेल. त्यातही हळद दूध घ्यायचे असल्यास दिवसा घ्यावे रात्री अजिबात नको.
4. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तणाव किंवा दबाव ज्याला प्रेशर किंवा टेन्शन असे म्हणतात ते घेऊ नका. आपलं मन प्रसन्न कसे राहील याकडे लक्ष द्या कारण आयुर्वेदात सांगितले आहे की, प्रसन्न आत्म इंद्रिय मनसा स्वस्थ इती अभीधियते| ही स्वस्थ व्यक्ती ची व्याख्या आहे.
5. कुठलीही लक्षणे अंगावर काढू नका तसेच त्याला घाबरू नका सजग रहा आणि लवकरात लवकर आपल्या फॅमिली डॉक्टरला आपल्या वैद्याला याबद्दल कल्पना द्या.
6. घराच्या बाहेर पडताना त्या व्यक्तीने आपल्या दोन्ही नाकपुड्या मध्ये कोमट तूप किंवा अणुतेल नावाच औषध दोन दोन थेंब नाकामध्ये टाकून किंवा बोटाने हलके नाकाच्या आत मध्ये लावून म्हणजेच प्रतिसारण करून बाहेर जावे.
7. बाहेरून आल्यानंतर आठवणीने हात पाय धुऊन हळद पाण्याच्या गुळण्या नक्कीच करा.
8. कामानिमित्त घराबाहेर जाणाऱ्यांनी घरी आल्यानंतर जेवण करताना शक्य असल्यास वेगळे जेवण करावं इतरांपेक्षा वेगळ्या वेळी बसावं आणि शक्य असेल तर राहायला पण वेगळं राहणं म्हणजेच वेगळ्या खोलीमध्ये राहाव. किंवा किमान डिस्टन्स मेंटेन करत वेगळ बसून जेवण करावं.
9. वाफ घेऊ नका डेली बेसिस वर तर मुळीच नाही एखादवेळी आठवड्यातून वाफ घेणे पुरे कारण त्याचे दुष्परिणाम जास्त व फायदे कमी हे दिसून येऊ लागले आहेत.
10. कफ वाढविणारे पदार्थ टाळा म्हणजेच दूध,दही,ताक दुग्धजन्य पदार्थ तसेच फळे हे सर्व टाळा. कारण हे सगळं कंठस्थ कफ वाढवण्यास मदत करतात. तेव्हा कृपा करून दुग्धजन्य पदार्थ आणि फळे पुढचे दोन किंवा तीन महिने शक्य असेल तर टाळाच.
11. दुपारी झोपणे हमखास टाळा याने कफ आणि पित्त दोघेही वाढतात.
12. एसीचा वापर नको थंड पाणी नको. किमान जेवताना तरी कोमट पाणी प्या च.
13. आंबट चव टाळा. लिंबु ,विटामिन सी च्या गोळ्या इत्यादी आंबट गोष्टी विनाकारण घेऊ नयेत त्याचे दुष्परिणाम जास्त आहेत. (टीप-विटामिन सी ची दैनंदिन मात्रा म्हणजे डेली नीड ऑफ बोडी ही 80mg/day इतकीच आहे)
14. न्यूमोनिया च्या बऱ्याच पेशंटमध्ये विटामिन सी बंद केल्यानंतर लवकर उपशम येऊन त्यांना रीकव्हार होण्यासाठी कमी वेळ लागला असे विवेचन अनेक वैद्यांनी पुराव्यासह सिद्ध केलेले आढळते. तेव्हा विनाकारण विटामिन सी च्या गोळ्या किंवा तत्सम सेवन बंद करा.
15. आपली औषधे नियमित पणे घ्या ती बुडवू नका विशेष करून डायबिटीस हायपर टेन्शन म्हणजे ब्लडप्रेशर व इतर सर्व आजारांसाठी च्या गोळ्या चालू आहेत त्या चुकवू नका.
16. डायबिटीस मुळे कोरोना बळावतो आणि जास्त त्रास देऊ शकतो म्हणून अशा रुग्णांनी डायबिटीस आहे विशेष काळजी घ्या.
आपल्या तब्येती मध्ये काहीही वेगळे बदल दिसत आहेत म्हणजेच पण कोण वाटणे पोट बिघडणे व काहीही वाटलं तर अंगावर न काढता डॉक्टर कडे जा आणि औषधे घ्या कृपा करून अंगावर काढू नका.Dont deny and delay.
17. Rapid antigen test, जरी निगेटिव्ह आली तरीही पुन्हा टेस्ट करावी लागते कारण या टेस्ट ची अॅक्युरॅसी 60% आहे (म्हणजेच फॉल्स निगेटिव्ह 40%).
18. रूम आयसोलेशन(विलगिकरण) महत्वाचे—ज्यांना ताप सर्दी खोकला वाटत असेल तरीही त्यांनी आयसोलेटेड व्हावं. आपले कपडे स्वतः वेगळे धुवावेत आपलं ताट वाटी स्वतः घेऊन वेगळी ठेवावी.
19. टॉयलेट वापरताना सुद्धा मास्कचा वापर करावा.
20. ज्यांच्या घरांमध्ये जागेच्या अभावी आयसोलेशन शक्य नसल्यास किमान एक पडदा किंवा चादर किंवा तत्सम उभा करू आयसोलेशन ठेवावं.
21. आपल्या डॉक्टरांनी निमोनिया साठी जर टेस्ट करायला सांगितली तर नक्की करून घ्या.
22. पण त्याबरोबर आयुर्वेद हवाच म्हणून आपल्या नजीकच्या वैद्याकडून आपल्याला हितकर असणाऱ्या आणि आपल्या प्रकृतीनुसार आपल्याला फायद्याच्या अशा आयुर्वेदिक औषधांचे सेवन लवकरात लवकर सुरू करा.
23. कोरोना पॉझिटिव व्यक्ती जर होम आयसोलेशन मध्ये असेल, तर सरकारने नेमलेले ब्राउचर वापरा आणि घरच्या इतर सदस्यांनी सुद्धा प्रतिबंधक औषधे घ्या.
24. Hydroxychloroquine (HCQ) हे परिचित औषध हार्ट बिट्स म्हणजे हृदयाचे ठोके वाढवणारे आहे तरी आपल्या डॉक्टरांना किंवा वैद्यांना आपली हिस्टरी किंवा इतिहास आपल्या झालेले रोग आपल्या चालू असलेली औषधे यांचं आधी नीट ज्ञान किंवा माहिती द्या.
25. ज्वराची लक्षणे असल्यास लंघन करावे. कडकडून भूक लागल्याशिवाय जेवण करू नये. लंघन हा एकमेव सुवर्ण उपाय आहे.
26. लंघन करताना तहान लागल्यास मध्येमध्ये सुंठ घालून उकळून गार केलेलं अथवा कोमट पाणी घोट घोट पीत राहावे.इतर काहीही खाऊ नये.
27. प्रोटीन अथवा तत्सम सप्लीमेंट अजिबात खाऊ पचायला हलके पदार्थ ते पण भूक लागल्यावरच खाणे उदाहरणार्थ माऊभात,पेज,मुगाचे कढण इत्यादी.
28. बऱ्याच वेळा गंधज्ञान जातं म्हणजे वास येत नाही, अशावेळी आपल्या वैद्यांना कळवा नस यासारख्या उपायांनी उपशम येतो.
29. सर्वात जास्त हानी टेन्शन घेतल्यामुळे होत आहे.
30. परिणामी सकारात्मक चरित्र कथा लेख यांचे वाचन करा सकारात्मक लोकांच्या संगतीत राहा.
31. जिथे शक्य असेल तिथे मदतीसाठी उभे रहा.
32. कोरोणातून बऱ्या झालेल्या लोकांना टाळू नका किंवा त्यांचा अवमान करू नका.
33. कोरोना होऊन गेल्यानंतरही काळजी घ्या आयुर्वेदिक औषधे घ्या आपल्या वैद्यांना संपर्क करा.
34. कोविड उत्तर रसायन चिकित्सा म्हणजेच बल हानी भरून काढण्यासाठी आणि धातूंचे बल वाढवण्यासाठी ज्याला आजच्या भाषेमध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी रसायन चिकित्सा काय असावे याकरिता आपल्या वैद्यांकडे मार्गदर्शन घ्या.
35. कोरोना नंतरही काही रुग्णांमध्ये घशात कफ अडकतो अशावेळी उपाय करताना तीळ तेलामध्ये सैंधव नमक घालून छातीला व पाठीला वरून खाली व आतून बाहेर या पद्धतीने तेल चोळा. दहा मिनिटे थांबून नंतर गरम पाण्याने अंघोळ करा..
36. काल दि ३० सप्टेंबर रोजी राज्य सरकार ने काढलेल्या परिपत्रकानुसार ICU मध्ये असणाऱ्या corona रुग्णांवर आयुर्वेदिक उपचार करण्याची अधिकृत परवानगी दिली आहे.
37. आयुर्वेद अंगीकार आणि निरोगी व्हा
38. काळजी घ्या स्वस्थ रहा आणि काहीही अडचण आली तर आपल्या वैद्यांना कळवा .
पुन्हा भेटू पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार
-पुष्कर हर्षवर्धन नाचणे
( अंतिम वर्ष आयुर्वेद विद्यार्थी)