top of page
Search

आयुर्वेदाच्या चष्म्यातून कोरोना भाग १

नमस्कार, मी, पुष्कर हर्षवर्धन नाचणे आयुर्वेदाचा विद्यार्थी (अंतिम वर्ष) आहे म्हटल्यावर आपल्याला कल्पना आलीच असेल की मी आपल्याशी आयुर्वेदा संदर्भातलीच माहिती लेख स्वरूपात मांडणार आहे.

माझा निव्वळ उद्देश हाच आहे की,आपणा सर्वांना आयुर्वेदाची गोडी निर्माण व्हावी व आयुर्वेदाकडे डोळसपणे बघण्,त्याला जाणून घेणं, अंगीकारणे, ही काळाची गरज आहे. आणि हो एवढेच नाही तर खरा आयुर्वेद व आयुर्वेदाच्या नावावर चाललेला भंपकपणा यातला फरक आपल्याला कळावा, आणि आपल्या सर्वांना सतर्क आणि डोळस होऊन प्रांजळपणाने आयुर्वेदाच्या सिद्धांत बद्दल गोडी निर्माण व्हावी व आयुर्वेद स्वीकारला तर आपले आयुष्य सुखी निरोगी याची खात्री आहे आणि त्याचसाठी हा लेखाचा खटाटोप

सगळ्यात पहिला लेख आपण कोरोना, आयुर्वेदात असलेला एक अनुक्त व्याधी आणि त्यावर प्रतिबंध आणि उपाय याविषयावर बघणार आहोत.

भगवान धन्वंतरींना नमन करून आपण आपल्या विषयाकडे जाऊया.

गेल्या सहा महिन्यापासून जगामध्ये व साडे चार महिन्यापासून भारतामध्ये ज्यान धुमाकूळ घातलाय,तो,कारोना,Covid 19 या नावाने आपण त्या रोगाला ओळखतो. तर या कोरोनाच वर्णन आयुर्वेदामध्ये कसा आला आहे? याआधी अशा महासंक्रमणाच्या साथी कधी येत नव्हत्या काय? जर आल्या असतील तर त्यातून आपले पूर्वज कसे बचावले? त्यांनी काय उपाययोजना केल्या? याबद्दल कधी विचार केला का आपण?

सगळ्यात प्रथम आपण हे लक्षात घेऊन ही महामारी नसून महा संक्रमण आहे ज्याला मॉडर्न भाषेमध्ये Pandemic या नावाने संबोधले जाते पण या सगळ्याच वर्णन अडीच हजार वर्षापूर्वी आचार्य चरकांनी जनपदोध्वंस या संज्ञेखाली उल्लेखले आहे. तर काय आहे हा जनपदोध्वंस? एकाच वेळी संपूर्ण जनपदाचा म्हणजेच जनसमूहाचां विध्वंस कीवा उध्वंस घडवणारी घटना.. याच जनपदोध्वंस चे दोन मुख्य हेतू म्हणजेच कारण वर्णन केलेले आहेत.

  1. साधारण कारणे-

  2. असाधारण कारणे-

1. साधारण कारणे-यामध्ये सर्व जनपदासाठी सारखीच असणारी कारणे जसे वायू,जल,देश,काल यांची दुष्टी ही होत (उत्तर उत्तर यांच्या या दृष्टीने भयंकर उपद्रव उद्भवतात, म्हणजे वाऱ्या पेक्षा जल त्यापेक्षा देश त्यापेक्षा काळ हा जास्त घातक आहेत.

  • वायू – दूषित व अहितकर वायू हे प्रथम कारण आहे,आजच्या भाषेमध्ये याला वायुप्रदूषण म्हणजेच प्रदूषित वायू जो औद्योगिक कारखान्यांमधून विविध वाहनांमधून आणि इतर मानवाकृत विविध विषारी वायू यामुळे वायूची दृष्टी होऊन होणारे असे जनपदोध्वंस व्याधी उद्भवतात.

  • जल - विकृत चव,गंध,वर्ण,स्पर्श असलेले जल, औद्योगिक वसाहतीतले प्रदूषित जल, जिथे निसर्गातील प्राणी पक्षी राहत नाहीत असे जल यांच्या मुळे असे व्याधी उद्भवतात.

  • देश - ज्या ठिकाणी प्राकृत स्वरूप बदलून जमिनीतील ओलावा वाढला आहे,हिंस्र श्वापद,किडे,कीटक,घुशी,साप इत्यादी फिरत आहेत,जिथे शेती पिकाचे नुकसान झाल आहे, असा प्रदेश म्हणजे दूषित देश. अगदी अलीकडचे उदाहरण बघायचं झालं तर काही महिन्यापूर्वी झालेला हा टोळ धाड हल्ला आणि झालेलं शेतीच पिकाच नुकसान.हे एक कारण

  • दूषित काळ - उन्हाळा पावसाळा या मध्ये अतिप्रमाणात ऊन किंवा पाऊस, त्याच बरोबर उन्हाळ्यामध्ये पाऊस किंवा पावसाळ्यामध्ये ऊन पडणं, किंवा त्यांचा अजिबात नसणे.म्हणजेच त्या त्या ऋतूनुसार हवामानाचा अतियोग आयोग किंवा मिथ्या म्हणजेच विचित्र योग..

ही सर्व साधारण कारण आहेत आता असाधारण कारणे बघू.

2.असाधारण कारणे- ही कारणं सर्व लोकांना लागू न पडता काही विशिष्ट लोकांच्या चुकीच्या किंवा वाईट वर्तनामुळे ज्या विध्वंसाला तोंड द्यावे लागते त्याबद्दलचे आहेत, जसे अधर्म,शस्त्र प्रभव,रक्षोगण,अभिशाप ही आहेत.

  • अधर्म - म्हणजे धर्माचे पालन न करणे, धर्म म्हणजे जे हिंदू मुस्लिम असे धर्म नसून आपल्या कर्तव्याचे पालन करणे म्हणजे धर्म. राजांनी राजाचा कर्तव्य न पार पाडणे, विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचं काम न करणे, इत्यादी. यासोबतच मनावरील तमोगुणाचा प्रभाव वाढल्याने काम क्रोध लोभ मत्सर इत्यादी गुणांनी विकृतीचा प्रभाव वाढत आहे आणि समाजामध्ये दुराचार आणि अनैतिकता वाढत आहे.आपल्या कर्तव्याचे पालन न केल्यामुळे आणि अधर्माचा प्रमाण वाढल्यामुळे अशा व्याधींना तोंड द्यावे लागत आहे.

  • शस्त्रप्रभव - काम,क्रोध, अहंकार यामुळे अधर्म वाढवून बलपूर्वक आक्रमण करण्, जागतिक महायुद्ध,जातीय दंगली, यायाचं अगदी तात्काळ उदाहरण म्हटलं तर चीन आणि पाकिस्तान यांच्याकडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधीचे उल्लंघन. हे एक महत्त्वाचं कारण आहे.

  • रक्षोगण - नैतिक अधःपतनमुळे, या मुख्य कारणात वाढ होत चालली आहे. यामध्ये भूतप्रेत, रोग उत्पादक जिवाणू, तसेच भूकंप महापुर यांचा समावेश होतो. यावर नियंत्रण ठेवण्याकरिता शासनाने आणि व्यक्तिगत निर्बंध आणि प्रतिबंध उपाय करणे महत्त्वाच आहे.

  • अभिशाप - गुरु,सिद्धव्यक्ती किंवा वृद्ध यांच्या शिकवणीनुसार पालन न करणे, परिणामी अहितकर घटनांचे पालन केल्यामुळे जनपद उध्वंस घडतो.

अशा प्रकारच्या कारणांमुळे कोरोना सारखे संक्रामक व्याधी जन्माला येतात..

संक्रामक रोगाविषयी सुश्रुत संहितेमध्ये पुढील वर्णन आले आहे.


“कुष्ठं ज्वरश्च शोषश्च नेत्रभिष्यंद एव च |

औपसर्गिक रोगाश्च संक्रामन्ती नरान्नराम् ||” सु.नि ६


कुष्ठ रोग, ज्वर(डेंग्यू,मलेरिया सारखे इतर सर्व साथीचे आजार ज्यात ताप येतो यातच COVID सुध्दा येतो),शोष (राजयक्ष्मा ची अवस्था), नेत्रभिष्यंद(डोळे येणे या सारखी साथ),हे काही मुख्य साथीचे रोग आहेत


आता थोडसं covid बद्दल बोलूया

यामध्ये दिसणारी प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे

  • ज्वर म्हणजे ताप.

  • प्रतिश्याय म्हणजे सर्दी किंवा वाहणारे नाक.

  • शुष्क कास म्हणजे खोकला.

  • कंठा मध्ये दाह म्हणजे घसा खवखवणे.

  • श्वास कष्ट म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणे.

  • अंगमर्द म्हणजे अंग दुखणे.

  • शिरशुल म्हणजे डोके दुखी.

  • अतिसार म्हणजे द्रव मल प्रवृत्ती – जुलाब.

  • नेत्र शोथ म्हणजे डोळे सुजणे.

  • फुफ्फुसात जलसंचय म्हणजे पाणी भरणे.

सदर सर्व लक्षणे बघता याचा वर्णन आयुर्वेदामध्ये सन्निपातज्वर त्यातही वात कफ प्रधान सन्निपातिक ज्वर याला साधर्म्य दाखवणारा आहे.

Modern medical science च्या भाषेत बोलायचं झालं तर सध्याच्या covid-19 वर कुठलंही औषध,उपाय किंवा लस अस्तित्वात नाही. परंतु याच वेळेला आयुर्वेदाचे चिकित्सा करणाऱ्या चिकित्सक आणि वैद्य यांचे अनेक covid पॉझिटिव्ह रुग्ण चिकीत्सा घेऊन बरे झाल्याचे आपण बघतोय आणि ऐकतोय, खरंतर याला महामारी न म्हणता महा संक्रमण म्हणायला हव, कारण मृत्यूचे प्रमाण हे अत्यल्प संक्रमणाचा प्रमाण आहे सगळ्यात जास्त आहे.यावर उपाय काय आहेत?तर आपण ऐकतो ते म्हणजे इम्युनिटी वाढवणे. तर असं काय करता येईल ज्याने इम्युनिटी वाढेल? तर या सगळ्याची उत्तर आहे आयुर्वेदाचा स्वीकार करा.. दिनचर्या,ऋतुचर्या,रसायन सेवन म्हणजे काय? आयुष काढा ज्याबद्दल सगळीकडे चर्चा सुरू आहे, तो कितपत गुणकारी आहे? पथ्य अपथ्याचा काय विचार covid मधे करता येईल? इम्युनिटी बुस्ट करण्यासाठी आयुर्वेदामध्ये काय काय उपाय करता येतील? वाफ घेणं किंवा जलनेती करणं,किती गुणकारी आहे?योगासन प्राणायाम covid मधे कसा फायदा करेल?या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या लेखाच्या पुढच्या भागात बघणार आहोत…तोपर्यंत नमस्कार..काळजी घ्या..


- पुष्कर हर्षवर्धन नाचणे


bottom of page